क्विंटन डिकॉकच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताचा आठ गडी राखून केला पराभाव

Mumbai beat Kolkata by eight wickets

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात मुंबई इंडियन्सचा आज कोलकाता नाईट रायडर्सशी सामना झाला. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला ज्यामध्ये मुंबईने कोलकाताला आठ गडी राखून एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात केकेआरचा नवा कर्णधार इयोन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताने मुंबई इंडियन्स विरूद्ध सामना जिंकण्यासाठी १४९ धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाता संघाकडून पॅट कमिन्सने ५३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार इयोन मॉर्गननेही ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

केकेआर कडून मिळालेल्या १४९ धावांचा लक्ष्याचा उत्तरावर मुंबईचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी वेगवान ९४ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ३५ धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यानंतर डिकॉकने हार्दिक पांड्याबरोबर टीमला कोलकाता विरुद्ध सहज विजय मिळवून दिला. डिकॉकने ४४ चेंडूत नऊ चौकार व तीन षटकारांसह ७८ धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पांड्यानेही ११ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावांची खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER