मुंबईत अनेक वसाहतींबाहेर लागत आहेत सीएएला समर्थन देणारे फलक

Banners come up in housing societies in suburbs backing CAA

मुंबई :– अनेक गृहनिर्माण वसाहतींबाहेर सीएए, एनआरसी आणि एनपीआरला समर्थन देणारे फलक झळकले आहेत. हे फलक मुलुंड, बोरीवली आणि ठाणे परिसरात लागले आहेत. हा परिसर गुजरातीबहुल आहे. या संदर्भातील संदेश व्हाट्सऍपवरही प्रसारित होत आहेत. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या समर्थनात भायंदर येथे रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

या संदर्भात सर्व गृहनिर्माण वसाहतींच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका कळू शकली नाही; मात्र अनेकांनी या कायद्यांना समर्थन व्यक्त करताना प्रश्न केला की, या कायद्याला विरोध करणारे मोर्चे काढू शकतात, धरणे आंदोलन करू शकतात तर याच्या समर्थनात आम्ही किमान फलक तर लावू शकतो. ठाण्याच्या वसंत विहार भागातील गार्डन एन्क्लेव्ह येथेही सीएए आणि एनआरसीच्या समर्थनाचे फलक लागले आहेत. या वसाहतीचे पदाधिकारी विजय देशपांडे म्हणाले की – सीएए आणि एनआरसीबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येते आहे.

सीएए-एनआरसीविरोधात उद्धव ठाकरेंना ठराव मांडायला लावू : काँग्रेस

या विषयावर राजकारण सुरू असून सोशल मीडियावर याला धार्मिक रंग देण्याचे काम सुरू आहे. सीएए आणि एनआरसीच्या समर्थनात आम्ही फक्त फलक लावणार नसून याबाबत लोकांना खरी माहिती देण्यासाठी कार्यक्रमही घेणार आहोत. सीएए आणि एनआरसीला समर्थन देणाऱ्या एका व्हिडीओत म्हटले आहे की, मी माझ्या जुन्या मित्राला भेटायला गेलो.

इमारतीच्या चौकीदाराने मला रजिस्टरमध्ये माझे नाव, मोबाईल क्रमांक, कोणाला भेटायचे आहे, तो कोणत्या क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतो, भेटीचे कारण लिहायला लावून माझी सही घेतली. मी कुठून आलो आहे हे विचारून सर्व माहिती माझ्या मित्राला कळवल्यावर, माझ्या मित्राने माझी ओळख पटवली तेव्हा मला त्या इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. यात पाच  मिनिटे गेली. त्या वसाहतीच्या सुरक्षेसाठी मी ही माहिती देणे गरजेचे होते. मग, सरकार बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना, त्यांच्या इथे राहण्याबाबत त्यांची माहिती विचारत असेल तर त्यात चूक काय? सीएए आणि एनआरसीला माझा पाठिंबा आहे.