मुबई व चेन्नईतील सामन्यांत जमीन-अस्मानाचा फरक

Mumbai vs Chennai IPL

आयपीएलचा (IPL) पहिला टप्पा मुंबई (Mumbai) व चेन्नई (Chennai) येथे आटोपून आता दुसऱ्या टप्प्याचे सामने अहमदाबाद व दिल्लीत सुरू झाले आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईला 10 आणि चेन्नईला 10 सामने खेळले गेले आणि यात दोन्ही ठिकाणी एकदम वेगळे चित्र दिसून आले.

जिथे मुंबईला 20 पैकी 11 डावात 80 च्यावर धावसंख्या नोंदली गेली तिथे चेन्नईला असे फक्त दोनच डाव राहिले. चेन्नईच्या चेपॉकच्या खेळपट्टीवर अपेक्षेप्रमाणे फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहिला. तिथे फिरकी गोलंदाजांनी 50 विकेट काढल्या.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हीच संख्या फक्त 21 विकेटची राहिली. मुंबईला जलद गोलंदाजांनी 27.27 च्या सरासरीने 91 विकेट काढल्या.

दोनशेच्यावर धावसंख्या चेन्नईला फक्त एकदाच तर मुंबईला चार वेळा नोंदली गेली.

मुंबईत संघांनी पाठलागाला 10 पैकी 9 वेळा प्राधान्य दिले तर चेपॉकवर प्रथम फलंदाजी करुन प्रतिस्पर्ध्यास मोठे लक्ष्य देण्याचा ट्रेंड राहिला. चेपॉकवर केवळ चारदा पाठलाग करणारा संघ जिंकला आणि पाठलागात यशस्वी सर्वोच्च धावसंख्या 160 ची होती. वानखेडेवर 196 धावा हे विजय गाठलेले सर्वात मोठे लक्ष्य होते आणि दोनवेळा पाठलागात दोनशे धावा करुनही संघ अपयशी ठरले आहेत.

पाॕवर प्लेमध्ये दोन्ही ठिकाणी धावगती जवळपास सारखीच राहीली पण पाॕवर प्लेनंतर मोठा फरक दिसुन आला. पाॕवर प्लेनंतर चेन्नईत 7.66 च्या धावगतीने धावा जमल्या. हीच धावगती मुंबईत 9.34 ची होती. डेथ ओव्हर्स म्हणजे 16 ते 20 षटकात चेन्नईत धावगती 8.64 तर मुंबईत 10 च्यापुढे म्हणजे 10.86 होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button