अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या करणार शिवसेनेत प्रवेश ; पत्रकार परिषदेत मोठे खुलासे करण्याची शक्यता

Uddhav-Thackeray-Urmila-Matondkar

मुंबई :- काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) (उद्या) मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निवास्थान ‘मातोश्री’वर जात उर्मिला त्यांची भेट घेणार आहे. मात्र भेटीची वेळ अद्याप समोर आलेली नाही. तर दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता . इतकेच नाही तर त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उर्मिलाने चव्हाट्यावर आणला होता . त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच तिने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता.

दरम्यान विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचे समोर येत आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती.

ही बातमी पण वाचा : राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER