मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना ५ दिवसांच्या आठवड्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

Bombay Municipal Corporation BMC

मुंबई :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार असला तरी, मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ उशिरा मिळणार आहे. या संदर्भातील शासन आदेश सोमवारी प्राप्त झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देत, २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

मुंबई महापालिकेची पुढील सर्वसाधारण सभा ५ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यास विलंब होऊ शकतो, असंही अधिकाऱ्यानं सांगितलं. महापालिकेत पाच दिवसांच्या आठवडा लागू करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तो लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी मिळेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर सर्वसभेतून मंजुरी मिळवावी लागेल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.


Web Title : Mumbai 5 days week implementing will be delay in bmc

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)