१९ वर्षीय ‘त्या’ तरूणीचा अखेर मृत्यू; संतप्त पित्याचा बचावदलावर आरोप

मुंबई : खुल्या गटारात पडलेल्या १९ वर्षीय मुलीचा आज बुधवारी मृत्यू झाला. मुंबईतील ओशिवरा येथील आदर्शनगर परिसरातील मेगा मॉलजवळील खुल्या गटारात ही तरुणी पडली होती. कोमल जयराम मंडल ही तरुणी कामावरून परत येत असताना मंगळवारी रात्री ७.४५ वाजता ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी सात तासांपेक्षा जास्त वेळ बचावकार्य चालविले. बचावपथकाने कोमलला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तरुण शेतकऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट!

दरम्यान, बचावदलाने वेळीच कार्य सुरू केले असते, तर मुलीचे प्राण वाचविता आले असते, असा आरोप मुलीच्या पित्याने केला आहे. बचावपथक घटनास्थळी विलंबाने पोहचले, असा आरोप तरुणीचे पिता जयराम मंडल यांनी माध्यमांशी बोलताना आज केला.