ओवेसींसमोर पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या मुलीला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे . या तरुणीचं नाव अमूल्या असे आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमूल्याने या घोषणा दिल्या.

विशेष म्हणजे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेतले . त्यानंतर अमूल्या हिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले .

…तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

न्यायालयानं तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .

दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंचावर असताना अमूल्यानं मंचावर दाखल होत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे क्षणभर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत सभेचे आयोजकही गोंधळून गेले. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली. ‘शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडलं ते चुकीचंच होतं’ असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली आहे .