मुलींची सदाबहार ‘हॅट’…

Hat

उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर कडकडीत उन्हामुळे डोके एकदम तापून जाते. डोक्यात नुसता घामच येत नाही तर केससुद्धा घामामुळे ओले होतात. त्यामुळे बर्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण हॅटचा (टोपी) वापर करायला हरकत नाही.

डोके झाकणे या मोसमाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ऊन तुमच्या डोक्याच्या केसांपासून संपूर्ण त्वचेसाठी हानिकारक आहे. टोपी घातल्याने तुमच्या डोक्याचा उन्हापासून बचाव होतो. वारे येण्यासाठीसुद्धा जागा मोकळी ठेवतो. टोपी घालण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांपासून सुरू झाली आहे. पण आता फॅशन आणि गरज दोन्ही गोष्टी असल्यामुळे ‘हॅट’ आता जगभरात आपली वेगळी ओळख बनविते आहे. उन्हाळ्यात जूट, कॉटन किंवा डेनिमच्या हॅट फक्त तुमच्या डोक्याचाच बचाव करत नाही तर सौदंर्यातही भर घालतात. टोपीची फॅशन सदाबहार आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपासून महिलांमध्येही ही फॅशन आहे. हल्ली बर्‍याच डिझाइन, रंग आणि आकारात टोप्या मिळतात. उन्हाळ्यात तर बाजार टोप्यांनी भरून गेलेला दिसतो.

हॅट प्रत्येक पोशाखावर चांगली दिसते. खासकरून वेस्टर्न वेयर बरोबर. जींस-टी शर्ट, स्कर्ट, मिडी, केप्री किंवा जंप सूट सर्वांबरोबर हॅट मॅच करते. म्हणूनच आता उन्हात बाहेर जाताना, पार्टीत किंवा कॉलेजमध्ये जाताना तुम्ही हॅटचा वापर करू शकता. तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी हॅट आवश्यक आहे. हे सूर्यकिरणांपासून बचाव करेल तसेच स्टायलिश दिसेल.