मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने राम मंदिरासाठी दिलेत ११ लाख

Mulayam Singh Yadav's daughter-in-law donated Rs 11 lakh for the Ram temple

लखनौ : अयोध्येतील राम मंदिरासाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर समाजवादी पार्टीने टीका केली आहे. मात्र, पक्षाचे संस्थापक, संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची सून अपर्णा यादव यांनी मंदिरासाठी ११ लाख रुपये दाद दिले आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी देशभर निधी संकलन मोहीम सुरू आहे. अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटीया हे अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. अपर्णा यांनी राम मंदिरासाठी ११ लाख रुपये देणगी दिली.

एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली. अपर्णा म्हणाल्यात, राम मंदिर हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी आम्ही अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वच्छेने ११ लाख रुपये दिले आहेत. राम हा देशाचे चरित्र, संस्कार आणि सर्व आस्थेचे केंद्र आहे. हे देशाचे मंदिर आहे. प्रत्येकाने या मंदिरासाठी दान द्यायला हवे, असे मला वाटते. याच भावनेतून मी देखील दान दिले आहे.

कारसेवकांवरील गोळीबार दुःखद

राममंदिर आंदोलनाच्या काळात मुलायमसिंह मुख्यमंत्री असताना कारसेवकांवर झाला होता. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात अपर्णा यादव म्हणाल्यात, ते ज्या परिस्थितीमध्ये झाले ते अत्यंत दु:खद होते. मला त्यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते आता घडून गेले आहे. आज बदलले जाऊ शकत नाही. आपण आजचा विचार केला पाहिजे. आज आम्ही या पैशांचे समर्पण केले आहे. येणारी पिढी देखील रामाची अनुयायी म्हणून काम करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER