मुख्यमंत्री बॅनर्जींच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांची ‘घरवापसी’? भाजपला धक्का

Mukul Roy - Chief Minister Banerjee - Maharashtra Today

कोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसीची सुरुवात केली आहे. टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) हे पुन्हा टीएमसीत येण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्याविषयी आज तृणमूल काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

आज टीएमसीची संघटनात्मक बैठक होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जींसह टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. टीएमसीला सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुकुल रॉयही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बुधवारी तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय पक्षात दाखल होणार असल्याचे संकेत दिले होते. टीएमसी सोडून गेले असले तरी त्यांनी कधीही बॅनर्जी यांच्याविरुद्ध अपशब्द उच्चारले नाहीत, अशी स्पष्टोती सौगत रॉय यांनी दिली.

मात्र, मुकुल रॉय यांच्या पक्षबदलाच्या निर्णयाने भाजपला धक्का बसू शकतो. मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये दाखल झाले. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते, असे सांगितले जात आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button