संतोष पाटील यांना मूकनायक आदर्श पत्रकार पुरस्कार

Mukhnayak Adarsh Journalist Award for Santosh Patil

कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ मूकनायक ‘ वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त कृती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मूकनायक आदर्श पत्रकाराची घोषणा दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार संतोष पाटील यांना झाली. यावेळी पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन येथे उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील आ. चंद्रकांत जाधव, खा. धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेचे संस्थापक संचालक रघुनाथ मांढरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

एबीपी माझाचे विजय केसरकर, सकाळचे उपसंपादक सर्जेराव नावले, तरुण भारतचे क्राईम रिपोर्टर राजेंद्र होळकर, बी. न्यूजचे बाळासाहेब कोळेकर, पुण्यनगरीचे क्राईम रिपोर्टर बाळासाहेब पाटोळे,एस. न्यूजचे मंजीत भोसले, ईटीव्ही भारतचे शेखर पाटील, झी 24तास मिथुन राज्याध्यक्ष याना मूकनायक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार होणार आहे. यासह कोल्हापुरातील युवकांना रोजगार देणाऱ्या ‘आय मित्रा’ या संस्थेचा गौरव केला जाणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पाटील यांचाही सत्कार होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्षा रेश्मा जमादार यांनी केले आहे.