आज बाळासाहेब असते तर … ; मुकेश खन्नांनी शेअर केला व्हिडीओ

Balasaheb Thackeray and Mukesh Khanna.jpg

मुंबई :अभिनेता मुकेश खन्ना यांनी आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आज जर बाळासाहेब असते, तर मुंबईत अशा घटना घडल्या नसत्या, असे म्हटले आहे.

आज मला अशा व्यक्तीची आठवण येत आहे, ज्यांच्यासोबत आज मुंबईचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जोडलं गेलं आहे. ज्यांच्यासोबत हिंदुत्वाचं नाव जोडलं गेलं आहे. तुम्हाला कल्पना आलीच असेल की, मी कुणाविषयी बोलत आहे. मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलत आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना एकदाच भेटलो आहे. पण लहानपणापासून त्यांना पाहूनच मी मोठा झालो आहे. कारण मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो आहे, असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. मुंबईचा मी विकास पाहिला आहे. मी मुंबईमधील ज्या घटना पहिल्या आहेत आणि कसं शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईवर कंट्रोल होता, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. कॉलेजच्या आयुष्यापर्यंत हे मी पाहात आलो आहे. जर मुंबईमध्ये एखाद्या व्यक्तीनं घोषणा केली मुंबई बंद आहे, तर दुकानं बंद करणारे आधी बघायचे की, यामध्ये शिवसेनेचा सहभाग आहे का? आणि जर असेल तर चुपचाप दुकानं बंद केली जायची. पण जर एखाद्या दुसऱ्या पक्षानं मुंबई बंद केली, तर अनेकजण याकडे दुर्लक्ष करायचे. त्यांच्यात (बाळासाहेबांकडे) इतकी ताकद होती,’ असे खन्ना यांनी सांगितले .

त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पदाची मागणी किंवा इच्छा बाळगली नाही. त्यांची जर इच्छा असती, तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अगदी सहजपणे झाले असते. पण त्यांनी कधीच अशी इच्छा ठेवली नाही. त्यांच्यामध्ये कोणतीही समस्या सोडवण्याची ताकद होती. मला त्यांची सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडत होती, तर मी म्हणजे गर्वाने सांगा की मी हिंदू आहे. आपण हिंदू असूनही आज आपल्याला सांगताना लाज वाटते. आज बाळासाहेब जिवंत असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आज ज्याप्रकारे मतभेद सुरु आहेत ते झाले नसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER