मुकेश अंबानींची रिलायन्स अव्वल

भाग भांडवल म्हणून पहिला क्रमांक

Mukesh Ambani

मुंबई :- मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यासोबतच आता अंबांनीची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनीही अव्वल ठरली आहे. बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.

बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने घेतलेल्या उसळीने कंपनीचं बाजार भांडवल ५ लाख कोटी रुपयांहून अधिक गेले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या २ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशनला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल अंबानी आता मुख्यालय विकणार?

पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या या कंपनीने २०१८-१९ मध्ये एकूण ६ लाख २३ हजार कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर इंडियन ऑइलने याच वित्त वर्षात ६ लाख १७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले होते.

मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात दोन टक्क्यांनी वाढून १२७८र रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे कंपनीचे बाजार भागभांडवल ८.०७ लाख कोटी रुपये झाले. आता दुसऱ्या नंबरवर टीसीएस ही कंपनी आहे.

या श्रेणीतील देशातील अव्वल दहा कंपन्या अशा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस (टाटा कंस्लटन्सी सर्व्हिसेस), एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., हिंदूस्थान युनिलिव्हर, आयटीसी, स्टेट बँक, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक व आयसीआयसीआय बँक.

ही बातमी पण वाचा : नीता अंबानींच्या हँडबॅगेची किंमत २ कोटी !