
नवी दिल्ली : मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पेमेंट सर्व्हिससाठी न्यू अंब्रैला एंटिटीला प्रस्ताव दिला आहे, इन्फीबीम एवेन्यू, गुगल आणि फेसबुक यांच्यासोबत एकत्रीकरण असेल, न्यू अंब्रैला एंटिटीच्या माध्यमातून रिलायन्स ग्लोबल पेमेंट्स कंपनीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, न्यू अंब्रैला एंटिटीच्या माध्यमातून परदेशी पेमेंट्स सर्व्हिस देण्याची योजना आखत आहे.
जर रिलायन्स कंपनीला यासाठी ऑपरेटिंग लायसन्स मिळालं तर काही महिन्यांत मार्केटमध्ये विजा आणि मास्करकार्ड यासारख्या दिग्गजांना धक्का बसेल. सूत्रांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजनं न्यू अंब्रैला एंटिटीसोबत लॉन्ग टर्म प्लॅन बनवण्यास सुरुवात केली आहे. न्यू अंब्रैला एंटिटीसह आरआयएल युनिट, इन्फीबीम एवेन्यू, फेसबुक आणि गुगल मिळून प्रसार करतील. RIL ची यात ४० टक्के भागेदारी असू शकते, तर बाकी तीन कंपन्यांची मिळून २०-२० टक्के भागीदारी असेल. या चारही कंपन्यांनी एकत्र येत न्यू अंब्रैला एंटिटीकडे परवाना मिळवण्यासाठी मागील आठवड्यात अर्ज केला आहे.
न्यू अंब्रैला एंटिटीद्वारे लायसन्स मिळाल्यानंतर या चारही कंपन्यांनी बनवलेली एंटिटी भारताच्या डिजिटल पेमेंट्स प्रोसेसिंगमध्ये सक्षमपणे उभी राहणार आहे, न्यू अंब्रैला एंटिटी डिजिटल व्यवहारांसाठी एक व्यासपीठ आहे, अलीकडच्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये भारत दिवसेंदिवस प्रगती करत आहे. जास्तीत जास्त न्यू अंब्रैला एंटिटी पेमेंट्स नेटवर्क वेगवान डिजिटल व्यवहारांना चालना देईल अशी भारतीय रिझर्व्ह बँकेला अपेक्षा आहे. मागील बुधवारी ६ कंपन्यांनी डिजिटल व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज सोपवले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला