पंडित दीनदयाळ यांच्या जीवनावर आधारित मुघलसराय जंक्शन लवकरच ओटीटीवर

Mughalsarai Junction - Deendayal Upadhyaya

जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक पंडित दीनदयाळ यांचा मुघलसराय रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला होता. त्यांचा मृत्यू कसा झाला याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyaya) यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा सचिव म्हणूनही काम केले होते. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि लालकृष्ण आडवाणी (LK Advani) यांच्या ते अत्यंत जवऴचे होते.

महावीर प्रसाद यांच्या एम प्रसाद प्रॉडक्शन आणि अनूप जलोटांच्या अनूप जलोटा प्रॉडक्शनने पंडित दीनदयाळजींच्या जीवनावर मुघलसराय जंक्शन नावाचा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट दीनदयाळजींच्या जन्मदिनी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटात मोहित कनौजियाने दीनदयाळ उपाध्याय यांची भूमिका साकारली आहे. तर दीनदयाल उपाध्याय यांच्या शिक्षकाची भूमिका अनूप जलोटा यांनी साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन  आशीष कुमार कश्यप यांनी केले आहे तर संगीत दिले आहे चंद्रा सूर्या यांनी. चित्रपटाचे शूटिंग लखनौ आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात करण्यात आल्याची माहिती अनूप जलोटा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER