मुदखेड: मुख्यमंत्री आपल्या पाठीशी त्यामुळे भोकर विकासाला मिळणार गती- बापुसाहेब गोरठेकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी : भोकर मतदार संघात मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे भाजप सेना युवतीचे उमेदवार बापुसाहेब गोरटेकर यांची छोटे खाणी एक सभा घेण्यात आले भाजप सरकार मध्ये कोट्यवधी रुपयांचे विकास काम झाले असुन पुढे पण होणार आसा विश्वास मला होता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विश्वासाने मला भोकर मतदार संघाची जवाबदारी दिली आहे.

भारतात महासत्ता भाजपाची असुन येणारा मुख्यमंत्री पण भाजपाचा होणारच आहे यासाठी या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मला विशेष म्हणून उमेदवारी ची संधी दिली त्या संधीच्या मध्यामातुन या भागाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाटीशी आहे असे मत माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी चिकाळा व माळकौठा येथे जाहीर बैठकीत उपस्थित मतदारांना सांगितले.

यावेळी सुभाष पाटील किनाळकर, राजा खंडेराव, सरजेराव, सदाशिव पुपूलवाड, आत्माराम कपाटे, शंकर मुतकलवाड, शिवसेनेचे पिटु पाटील, युवराज पाटील, पंजाब पाटील, विशाबर पवार, गुलाबराव देशमुख, आरविद देशमुख, गुलाबराव पाटील, माधवराव गाढे, प्रल्हाद हाटकर, ,विठ्ठलराव पवार,हनंमत सरसे,नारायण पवार,बाळू पा. मुंगल,गणेशराव शिंदे,गुलाबराव सुर्यवंशी ,कुणाल चौधरी, यांच्या सह अदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळकौठा येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चिकाळा येथे पण गोरटेकर यांचे जंगी स्वागत ग्रामस्थ यांनी केले आहे.