एमटीडीसीचे रिसॉर्ट सुरू होणार

MTDC has decided to start the resort

सिंधुदुर्ग : अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात एमटीडीसीने (MTDC) महत्त्वाचा निर्णय घेत रिसॉर्ट (Resort) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन पद्धतीने बूकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी सांगितले.

हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल केल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन एमटीडीसीचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याने शंभर टक्के बूकिंग घेतले जाणार आहे. ऑनलाईन आणि पर्यटकांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून देणे अनिवार्य असून कोविडबाबतची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हलदेखील तपासली जाणार आहे. फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर देखील अनिवार्य असून गर्दी होणार नाही, याची देखील काळजी घे जाणार आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने सुरू करीत आ सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER