सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणचे शेतकऱ्यांनी थकवले दीड हजार कोटी

MSEDCL

सांगली : महावितरण (MSEDCL) आर्थिक आरिष्टात सापडत आहे. घरगुती, व्यापारी औद्योगिक ग्राहकांसह कृषी पंपांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात केवळ कृषी पंप ग्राहकांची थकबाकी तब्बल 446 कोटी 19 लाख रुपये झाली आहे. तर सांगली (Sangli) जिल्ह्यात एक हजार 177 कोटी थकबाकी आहे. थकबाकीचा विषय महावितरणची डोकेदुखी बनली आहे.

सांगली जिल्ह्यातील दोन लाख 27 हजार 603 शेतकऱ्यांकडे 1177 कोटी सात लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये इस्लामपूर विभागातील 41779 शेतकऱ्यांची 149 कोटी 32 लाख रुपये, कवठेमहांकाळ विभागातील 70387 शेतकऱ्यांची 477 कोटी 80 लाख रुपये, सांगली ग्रामीण 51646 शेतकऱ्यांकडे 239 कोटी दोन लाख रुपये, सांगली शहरातील 1571 शेतकऱ्यांची पाच कोटी 46 लाख रुपये तर विटा विभागातील 62220 शेतकऱ्यांकडे 305 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुली महावितरणसमोर मोठे आव्हान आहे.

30 नोव्हेंबरअखेर कोल्हापूर जिल्हयातील एक लाख 40 हजार 626 शेतकऱ्यांकडे कृषी पंपांची थकबाकी 446 कोटी रुपये थकबाकी आहे. गडहिंग्लज विभागात 26827 ग्राहकांकडे 64 कोटी 84 हजार रुपये, इचलकरंजी विभागात 5758 ग्राहकांकडे 15 कोटी 16 लाख रुपये, जयसिंगपूर विभागात 31515 शेतकऱ्यांकडे 128 कोटी 84 हजार रुपये, ग्रामीण विभाग एक मध्ये 37981 शेतकर्यांची 112 कोटी सहा लाख रुपये, ग्रामीण विभाग दोन मधील 37347 शेतकऱ्यांची 123 कोटी 83 लाख रुपये थकबाकी आहे. कोल्हापूर शहरातील 1138 शेतकऱ्यांकडे एक कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुली महावितरणसमोर मोठे आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER