मृणालने नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट

Mrunal

मधु इथे आणि चंद्र तिथे असे शब्द असलेले मराठी सिनेमातील गाणी गाणं प्रसिद्ध आहे. तर मध्यंतरी याच संकल्पनेवर मधु इथे आणि चंद्र तिथे या नावाची मालिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. थोडक्यात काय तर लग्नानंतरही कामाच्या निमित्ताने दोघेजण वेगवेगळ्या शहरातच नव्हे तर वेगवेगळ्या देशात राहतात पण एकमेकांना वेगवेगळ्या माध्यमातून भेटतही असतात. त्यात बायकोचे करिअर अभिनय क्षेत्रात असेल आणि नवऱ्याचं करियर हे संगणक क्षेत्रात असेल तर दोघांमधलं अंतरही सातासमुद्रापार असतं. अभिनेत्री मृणाल दुसानीसचा नवरा देखील त्याच्या कामानिमित्ताने अमेरिकेत राहतो तर मृणाल (Mrunal) भारतात राहते. या दुराव्यात प्रेम टिकवून ठेवत त्या दोघांनी त्यांचं नातंही बहरत ठेवलं आहे. सध्या मृणाल दुसानीसने तिच्या इन्स्टा पेजवर शेअर केलेली एक आगळीवेगळी पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. हातात पृथ्वीची प्रतिकृती घेऊन ” सगळं जग एका बाजूला आणि तू एका बाजूला” असं म्हणत नवरा नीरजसाठी काही पण अशी खास ओळ पोस्ट केली आहे.

मराठी मालिका इंडस्ट्रीतील एक सोज्वळ चेहरा अशी ओळख असलेली मृणाल दुसानीसने आतापर्यंत चार मालिका केल्या आहेत आणि विशेष म्हणजे या चारही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड हिट ठरल्या आहेत. नुकतीच मृणाल अनुश्री दीक्षित या भूमिकेतून सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेत भेटली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला मात्र तिची आणि शशांक केतकर (Shashank Ketkar) याची केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांनी अनुभवली होती.

माझिया प्रियाला प्रित कळेना ही मृणालची पहिली मालिका. तर तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली मंजिरी ही भूमिका देखील गाजली होती. श्रीमंत दामोदर पंत या सिनेमात देखील तिने छोटीशी भूमिका केली होती.

असं सासर सुरेख बाई ही मालिका सुरू असतानाच तिचे नीरज मोरे या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या आणि आता नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत असलेल्या पुणेकर तरुणाशी लग्न झालं. मृणाल ही मूळची नाशिकची. तीचं सासर पुण्याला तर माहेर नाशिकला आणि कामासाठी तिला मुंबईत राहावं लागत . लग्नानंतरही मृणालने काही दिवस मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने मुंबईतच मुक्काम ठोकला मात्र त्यानंतर अमेरिकेला जाण्यासाठी असं सासर सुरेख बाई ही मालिका सोडली होती. अमेरिकेत राहून आल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सक्रीय झाली आणि सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर आली. दरम्यान सहा महिन्यापूर्वी नवरा नीरजला भेटायला तिला अमेरिकेला जायचं होतं. तेव्हा ती सुखाच्या सरीनी हे मन बावरे ही मालिका करत होती. मात्र आपल्याला माहीतच आहे मालिकेतील मुख्य कलाकारांना मोठी सुट्टी हवी असते तेव्हा मालिकेच्या कथानकात काही बदल करावे लागतात. आणि म्हणूनच सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेतील तिच्या ऑफिसच्या ट्रेनिंग साठी बाहेरगावी गेल्याचे दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात तिच्या नवऱ्याला नीरज ला भेटायला मोठी सुट्टी काढून अमेरिकेला गेली होती. गेल्या तीन वर्षांमध्ये नीरज देखील मृणालला भेटण्यासाठी अनेकदा भारतात आला आहे. सध्या मृणाल भारतात तर नीरज अमेरिकेत आहे. त्यामुळे एकमेकांना ही दोघं मिस करत आहेत. म्हणूनच मृणालने पोस्ट केलेली खास ओळ आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी माझ्या नेहमी सोबत राहशील या भावना तिच्या आणि नीरजच्या नात्यातील बंध किती घट्ट आहेत हे दाखवणाऱ्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER