मिसेस सीएम रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, वर्षावर होणार क्वारंटाईन

Rashmi Thackeray - Corona Positive - Maharashtra Today

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पत्नी रश्मी ठाकरेंना (Rashmi Thackeray) कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची (Corona) लस टोचून घेतली होती.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER