मृणालचा नवा लूक

Mrinal Dusanis new look

अभिनेत्रींच्या मालिकेमधील लूककडे प्रेक्षकांचे लक्ष असतं तितकंच वैयक्तिक आयुष्यातही अभिनेत्री सतत काही ना काही तरी मेकओव्हर (Makeover) करत असतात त्याकडेही चाहते सतत डोळे लावून बसलेले असतात. शिवाय आजकाल सेलिब्रिटी सोशल मीडियावर ॲक्टिव असल्यामुळे त्यांच्यातील मेकओव्हर किंवा बदललेला लूक चाहत्यापर्यंत सहज पोहोचत असतो. सध्या चर्चा आहे ती अभिनेत्री मृणाल दुसानीस (Mrinal Dusanis) हिने तीची बदललेली हेअर स्टाईल या विषयाची. इन्स्टा पेजवर तिने काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोमध्ये मृणालने तिचे केस अगदी मानेपर्यंत कमी केल्याचे दिसत आहे. अर्थात नेहमीच एक सोज्वळ चेहरा म्हणून मालिकेत ती लांब केसांमध्ये दिसत होती. मात्र आता खऱ्या आयुष्यामधला छोट्या केसांचा लूक तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेतील मृणाल दुसानीस काम करत होती. अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत तिची या मालिकेत चांगलीच केमिस्ट्री जुळली होती. काही महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली आणि त्यानंतर मृणाल तिच्या नाशिकच्या घरी गेली. नाशिक हे तिचं माहेर आहे आणि पुणे हे तिचे सासर आहे. आता सध्या कुठल्या मालिकेत काम करत नसल्यामुळे नाशिक पुणे असा तिचा प्रवास सुरू असतो. खरंतर मृणाल इतर अभिनेत्रीप्रमाणे फारशी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसते पण यावेळी मात्र तिने तिच्या बदललेला लूक खास प्रेक्षकांना सोशल मीडिया पेजवर शेअर केला असल्याने तिच्या चाहत्यांनीदेखील तिला खूप धन्यवाद दिले आहेत. चाहत्यांनीच नव्हे तर तिच्या मराठी सिनेमा आणि मालिका इंडस्ट्रीमधील अभिनेत्री मैत्रिणींनी देखील मृणालला तिला छोटे केस छान दिसतात दिसत असल्याचा अभिप्राय दिला आहे. सध्या छोट्या केसांची क्रेझ आहे.

मृणाल सांगते, हा हेअर कट मला बऱ्याच दिवसांपासून करायचा होता पण मालिकांमध्ये काम करत असताना अनेकदा आपल्याला एखाद्या हेअर कट करायचा असतो पण तो काही कारणाने करता येत नाही. कधी कधी भूमिकेची गरज असते आणि जर आपण काही बदल केले तर त्यामुळे मालिकेतल्या रोलच्यावर दिसण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी बरेच दिवस वाट बघत होते की कधी एकदा माझ्या केसांची उंची लांबी कमी होईल ? मग जेव्हा जेव्हा सुखाच्या सरिनी हे मन बावरे ही मालिका संपली आणि सध्या तरी कुठलीही नवी मालिका घेण्याचा विचार केलेला नाही त्यामुळे हीच ती वेळ होती असं मला वाटतं की जेव्हा मी माझ्या मनातला हेअरकट प्रत्यक्षात करू शकले. सुरुवातीला मला वाटले की आपले केस खूपच कमी केले आहेत पण जेव्हा थोड्या दिवसांनी मला त्याची सवय झाली आणि हा लूक आपल्याला चांगला शोभून दिसतोय हे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा पासून मला पण खूप छान वाटत आहे.

माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेच्या माध्यमातून मृणाल दुसानीस अभिनेत्री मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आली आणि काही दिवसांमध्ये तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला. मालिकांमध्ये एक सोज्वळ चेहरा लक्ष वेधून घेत असतो. मृणालच्या चेहऱ्याचे तेच वैशिष्ट्य असल्यामुळे तिला आलेल्या भूमिकादेखील साधीसरळ मुलगी अशाच आशयाच्या आहेत. पण प्रत्यक्षात जेव्हा अनेक मालिकांमध्ये कलाकार ऑफ कॅमेरा धमाल करत असतात तेव्हा इतर सहकारी कलाकारांसोबत करत असलेली मजा-मस्ती आपण पाहत असतो. मृणाल यामध्ये आघाडीवर आहे.

असं सासर सुरेख बाई, तू तिथे मी या मालिकांमध्ये मृणालच्या भूमिका गाजल्या होत्या. नीरज मोरे या पुण्यात राहणाऱ्या पण सध्या अमेरिकेमध्ये असणाऱ्या इंजिनियरसोबत मृणाल ने लग्न केले आहे. सध्या काही दिवस भारतात तर काही दिवस अमेरिकेत राहत असते. नवरा नीरज सोबतचे देखील अनेक फोटो ती शेअर करत असते. खरे तर मृणालने पत्रकारितेचं शिक्षण घेतले आहे. सुरुवातीचे काही दिवस ती लेखन करत होती पण अभिनयाच्या आवडीतून तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत तिने चार मालिका केल्या आहेत आणि चारही मालिका तिच्या हिट ठरल्या. त्यामुळे मालिका विश्वामध्ये मृणालचे नाव सतत चर्चेत असते. ती कुठल्या नव्या मालिकेत दिसणार याची उत्सुकता नेहमीच तिच्या चाहत्यांना देखील लागून राहिलेली असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER