मुख्यमंत्री महोदय, फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय? नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा!

CM Uddhav Thackeray - Narayan Rane

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. ५९ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे राज्य सरकारचं पाप आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना?” अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री महोदय,, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागले , तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचे काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसते मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय? असे राणे म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढतेय. राज्यात ५९ हजार रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४१ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते. जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतलंय. दम देण्याचं काम राज्य सरकार करत होतं. शेवटी त्यांनी लॉकडाऊन लागू केला. रिक्षावाल्यांना १५०० देणार. पण ५ माणसांचं कुटुंब १५०० रुपयांमध्ये उपजीविका करू शकणार आहे का? अशा शब्दांत राणेंनी टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button