MPSC परिक्षांचा गुंता सुटणार; मुख्यमंत्र्यांसोबत मराठा संघटनांची आज बैठक

CM Uddhav Thackeray - Maratha Reservation

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थगिती मिळाल्यानंतर त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत शासन स्तरावरच्या परिक्षा किंवा भरतीसाठी मराठा संघटना विरोध दर्शवत आहेत.

म्हणूनच, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना ‘MPSCच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे. या संदर्भात आज गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे.

मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली व त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मेटे म्हणाले एमपीएससी परिक्षा प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचं मेटे यांनी सांगितलं.

एमपीएससीच्या परिक्षांसदर्भात बुधवारी नवी मुंबईत बैठक झाली. ते म्हणाले, या बैठकीत ’11 तारखेला जर MPSC ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’ असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, आज या विषयावर तोडगाी निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER