एमपीएससी परीक्षा : सरकार श्रीमंत मराठयांच्या दबावाला बळी पडते, आंबेडकरांचा आरोप

Prakash-Ambedkar-Uddhav-Thackeray

अकोला :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) (MPSC) च्या परिक्षा सरकारने पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत सरकार श्रीमंत मराठयांच्या दबावाला बळी पडते आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

ते म्हणालेत, कोरोनाचे (Corona) कारण देऊन सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. सरकारचा हा निर्णय ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. याबाबत राज्य शासन श्रीमंत मराठयांच्या दबावाला बळी पडते आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता तरी कणा दाखवला पाहिजे व परीक्षा घेतल्या पाहिजेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER