एमपीएससीची परीक्षा ८ दिवसात होणार – उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray - MPSC Exam

मुंबई :- एमपीएससीची (MPSC) १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली असली तरी ती ८ दिवसात घेतली जाईल. परीक्षेची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली.

या संदर्भात रात्री फेसबुक लाईव्हवरून जनतेला संबोधित करताना ते म्हणालेत की, कोरोनाची वाढलेली साथ लक्षात घेऊन विध्यार्थी व परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या या निर्णयाचा विध्यार्थी आणि विविध राजकीय नेत्यांनी विरोध केला. या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचाही समावेश आहे, हे उल्लेखनीय.

असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष हे आंदोलन भडकवत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप करताना विध्यार्थ्यांना आवाहन केले की, काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणालाही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊ नका.

ही बातमी पण वाचा : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यामुळे रोहित पवारही नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER