मराठा आरक्षणासाठी एमपीएससीची (MPSC) परीक्षा पुढे ढकलली

MPSC exam postponed for Maratha reservation

मुंबई : मराठा समाजाच्या (Maratha reservation) मागणीनुसार ठाकरे सरकारने (Thackeray Govt) एमपीएससीची  (राज्य सेवा मंडळा)  परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही माहिती दिली. एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून वारंवार होत होती. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंच्या  (Vinayak Mete) अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात (SC) स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडल्यानंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा ११ आॅक्टोबरला होणार होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीचा निर्णय कसा घेतला, असा सवालही मेटे आणि मराठा आंदोलनातल्या नेत्यांनी उपस्थित केला होता. याबाबत विरोधकही मुख्यमंत्र्यांवर टीका करत होते. आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने नाराज मराठा समाजाला दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आणि एमपीएससीबद्दल सोशल मीडियातून पोस्ट केली होती.

मराठा समाजाचा अंत पाहू नका, असे म्हणत उदयनराजे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच १५ हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे, अशी टीका उदयनराजेंनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल संभाजीराजेंनी मानले सरकारचे आभार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER