एमपीएससी परीक्षा आंदोलन : पडळकरांसह निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Gopichand Padalkar - Arrested

पुणे : एमपीएससी परीक्षाची परीक्षा ठरल्याप्रमाणे १४ मार्चलाच घ्या या मागणीसाठी दुपारी १ वाजेपासून नवी पेठ रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रात्री साडेनऊच्या सुमाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, रात्री फेसबुक लाईव्हवरून जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली असली तरी ती ८ दिवसात घेतली जाईल. परीक्षेची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल.

मात्र, यानंतरही १४ मार्चची नियोजित पूर्वपरीक्षा ठरल्याप्रमाणेच घ्या, या मागणीवर निदर्शक ठाम होते. परीक्षेची निश्चित तारीख घोषित होईपर्यंत रस्त्यावरच बसून राहू, अशी घोषणा निदर्शक व आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे (BJP) आमदार गोपीनाथ पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा झाल्यानंतर दुपारी १ वाजेपासून हे आंदोलन सुरू होते.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या या निर्णयाचा विध्यार्थी आणि विविध राजकीय नेत्यांनी विरोध केला. या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचाही समावेश आहे, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER