अमराठी खासदारांनी घेतली मराठीतून शपथ, सुळें यांनी हिंदी तर, उदयनराजे, सुजय विखे यांना इंग्रजीचा मोह

MPs take oath in Marathi

मुंबई :- मोदी सरकार – 2 चं पहीलंच संसंदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठी बाणा जपत मराठीतून शपथ घेतली. तसंच महाराष्ट्रातील इतर खासदारांनीही मराठीतून शपथ घेतली. शपथविधी सुरू असताना एमआयएमचे औरंगाबादचे खासदार शपथ घेण्यासाठी उभे झाले ते कोणत्या भाषेतून शपथ घेतात यासाठी सर्वांचेच त्यांच्याकडे लक्ष लागले होते, परंतू मराठी भाषेचा सन्मान ठेवून खासदार इम्तीयाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतली.

इम्तियाज जलील आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी अमराठी भाषिक असूनही मराठीतून शपथ घेतली, मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हिंदी, तर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेत इंग्रजी प्रेम लपवता आले नाही, अशी कुजबूज संसद वर्तूळात होती. त्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

#मराठीतशपथ हे अभियान सोशल मीडियावर सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुतांश खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर 48 खासदारांपैकी 34 खासदारांनी काल मराठीतून शपथ घेतली. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांनी, तर भाजपच्या 11 खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. यामध्ये भाजपचे अमराठी खासदार मनोज कोटक यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुनिल तटकरे, राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा आणि एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठीतून शपथ घेतली. आपली राज्यभाषा मराठी आहे. यामुळे संसदेत मराठी भाषेत शपथ घेतली’, असं जलील म्हणाले. मराठी भाषेत शपथ घेतल्याबाबत त्यांनी अभिमान असल्याचेही बोलले.

दुसरीकडे, भाजपचे उन्मेश पाटील, सुनिल मेंढे आणि गिरीश बापट यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. गीर्वाणवाणी मानल्या जाणाऱ्या संस्कृतमधून शपथ घेणंही कौतुकास्पद मानलं गेलं. मात्र पाच खासदारांनी संसदेत हिंदीतून तर दोघा खासदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली. भाजपच्या हीना गावित, पूनम महाजन, सुधाकर शृंगारे या मराठमोळ्या खासदारांसह गोपाळ शेट्टी यांनी हिंदीतून शपथ घेतली. तर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना इंग्रजीतून शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.