शिवजयंतीच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंची ठाकरे सरकारला समर्थन

CM Uddhav Thackeray - Shiv Jayanti - Udayan Raje Bhosale

सातारा : कोरोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंधासोबतच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निर्बंध घातल्यामुळे भाजपने सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली . मात्र, याच मुद्द्यावर सामंजस्याची भूमिका घेत भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवाजी ‘महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता, असे म्हटले .

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची येत्या 19 फेब्रुवारी रोजी 390 वी जयंती आहे. दरवर्षी या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जवाबदारी आहे. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या,” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER