खा. सुप्रिया सुळे लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी तर सुनील तटकरे उपनेतेपदी

Supriya Sule-Sunil Tatkare

मुंबई :- खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी तर खासदार सुनील तटकरे यांच्याकडे उपगटनेतेपद सोपविण्यात आले आहे तर पक्षाचे चिफ व्हिप म्हणून लक्षद्विपचे एकमेव खासदार मोहम्मद पी.पी. फैजल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेने लोकसभेतील आपल्या नेत्यांची घोषणा केली.

खासदार सुनील तटकरे यांनी ट्विटकरून निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझी लोकसभेत उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे मनःपूर्वक आभार! या संधीचा मी आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी पूर्ण उपयोग करेन.”, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.