रायगड येथील रोषणाईवरुन खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली नाराजी

Sambhaji Raje

पुणे : शिवजयंतीनिमित्त (Shiva Jayanti)रायगडवर विद्युत रोषणाई ( lighting in Raigad) करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने केलेल्या या विद्युत रोषणाईवर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी समाजमध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे. रायगडवर करण्यात आलेली ही प्रकाशयोजना अत्यंत विचित्र असून महान वारशाचा अपमान करणारी आहे अशा शब्दांत खा. संभाजीराजे (MP Sambhaji Raje )यांनी संताप व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून फोटो शेअर करत विद्युत रोषणाई अपमान करणारी असल्यासाजे म्हटले आहे. संभाजीराजेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रक योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दुःखी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER