संभाजीराजेंनी घेतला आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद ; मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु

Sambhaji Chhatrapati

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टानं (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द ठरवले आहे.यापार्श्वभूमीवर मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे . आता आरक्षणाच्या लढ्यासाठी भाजप खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (CM Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.

माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button