खासदार रिटा बुहुगुणा – जोशी यांच्या नातीचा मृत्यू; फटाके फोडताना कपडे पेटले

MP Rita Bahuguna - Joshi's grandson dies; Clothes caught fire as firecrackers exploded

प्रयागराज : भाजपाच्या खासदार रिटा बहुगुणा- जोशी (MP Rita Bahuguna)यांची ६ वर्षांची नात फटाके फोडत असताना तिचे कपडे पेटले; भाजल्याने तिचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी झाला.

सोमवारी फटाके फोडताना तिच्या कपड्यांना आग लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

रिया यांचा मुलगा मयंक जोशी यांची ही एकुलती एक सहा वर्षांची मुलगी गच्चीवर फटाके फोडत होती. तिच्या कपड्यांवर ठिणगी उडाली आणि कपडे पेटले. ती जवळपास ६० टक्के भाजली. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिला एअर अॅम्बुलन्समधून दिल्लीला शिफ्ट केलं जाणार होत. परंतु, त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

उपचारासाठी रिटा यांच्या नातीला दिल्लीला हलवण्यापूर्वी प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला, अशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्या दिली.

केशव प्रसाद मौर्या यांनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केल व लहान मुलांना विस्फोटक आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवण्याच आवाहन केल.

रिटा बहुगुणा जोशी यांच्या नातीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ती कोरोनामुक्तही झाली होती. गुडगाव येथील रुग्णालयात आजी रिटा आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार करण्यात आले होते. अलाहाबाद येथील खासदार रीटा जोशी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER