पक्षांबाबत विचार वेगवेगळे असू शकतात; पण कुटुंब म्हणून आम्ही सोबतच : रक्षा खडसे

Raksha Khadse

जळगाव :  राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat elections) आज (१५ जानेवारी) मतदान होत आहे. यावेळी मुक्ताईनगर येथे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी गावात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मात्र, यावेळी पहिल्यांदाच एकनाथ खडसेंविना (Eknath Khadse) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे एकाच कुटुंबात, एकाच घरात राहूनही सून रक्षा खडसे भाजपमध्ये तर एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आहे.

“परिवार म्हणून आम्ही सोबतच आहे, नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते. एका घरात राहतो, विचार पक्षांना घेऊन वेगवेगळे असू शकतात. एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे मी आज मतदानाचा हक्क गावकऱ्यांसोबत बजावला, असे त्यांनी स्पष्ट केले . मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रक्षा खडसे यांनी माध्यमाशी  संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यात ४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER