बीडवासीयांना दिसला खासदार प्रीतम मुंडें यांच्यातील डॉक्टर, अपघातग्रस्त महिलेला मदत

Pritam Munde

बीड: येथील नागरिकांना खासदार प्रीतम मुंडे यांच्यातील डॉक्टर पाहायला मिळाला. त्या रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली यानंतर त्यांनी गाडी थांबवून महिलेकडे धावत गेल्या आणि महिलेला पाणी दिले. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत तिला रुग्णालायत दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्येसुद्धा त्यांनी अशीच एका रुगणाला मदत केली आहे.

लताबाई प्रकाश भोसले(रा.गव्हाणे कौडगाव ता.परळी) या दुखापतग्रस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या असल्याचे प्रीतम मुंडेंना दिसल्या. जखमी महिलेला पाहताक्षणी प्रीतम मुंडेंनी गाडी थांबवून दुखापतग्रस्त महिलेकडे धाव घेतली. जखमी महिलेला स्वतःहून पाणी प्यायला देत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. लिंबोटा येथील श्रमदान आटोपून सिरसाळामार्गे सरफराजपूरकडे जात असताना पांगरीपासून काही अंतरावर त्यांना लताबाई या महिला दिसल्या. लताबाई भोसले यांना पांगरी येथील माऊली क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांचे वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर प्रीतम मुंडे राजकारणात आल्या होत्या.

देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे. प्रीतम मुंडे या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. त्या उच्चशिक्षीत असून, त्यांनी M.D. (Dermatology, Venereology & Leprosy) शिक्षण घेतले आहे.