बॉलिवूडच नाही, राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग अ‍ॅडिक्ट; खासदार नवनीत राणांचा आरोप

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session Parliament) दिल्लीत सुरू आहे. तसेच अनेक बॉलिवूड अभिनेत्री संसदेत खासदारदेखील आहेत. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला (Sushant Singh commits suicide) ड्रग्ज अँगल मिळाल्यानंतर यावर संसदेतदेखील चर्चा होताना दिसत आहेत. त्यातच अमरावतीच्या खासदार आधीच्या साऊथच्या अभिनेत्री नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा केला आहे.

फक्त बॉलिवूडच नाही, तर राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्ती आहेत, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आज संसदेत म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, सुशांतप्रकरणात नवनवे पैलू समोर येत आहेत. त्यातच आता काहींनी या प्रकरणात “बॉलिवूडला टार्गेट केले आहे, पण या बॉलिवूड-टॉलिवूडने आमच्यासारख्या अनेक कलाकारांना नाव, प्रसिद्धी दिली आहे. आपण कोणत्याच इंडस्ट्रीला पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. जे ड्रग्जचे सेवन करतात, तुम्ही त्यांना बोला, पण संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करु नका. कारण काहींच्या अशा वक्तव्याने देशातच नाही, तर जागतिक पातळीवर बॉलिवूडची प्रतिमा मलीन होत आहे” असे नवनीत कौर राणा म्हणाल्या.

“काही टक्के राजकीय नेत्यांची मुलेसुद्धा ड्रग्ज प्रकरणात आहेत. क्रिकेटचे तर ड्रग्जशी जुने कनेक्शन आहे. अमुक एका क्रिकेटपटूने ड्रग्ज घेतल्याचे आपण अनेकदा ऐकतो. बॉलिवूड ही अशी इंडस्ट्री आहे, जिला फक्त महाराष्ट्रातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदराने पाहिले जाते. त्यामुळे तुम्ही अशी सरळ टीका करु शकत नाही. तसेच, मी याबाबत कोणाचंही समर्थन करु शकत नाही” असेही नवनीत राणांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER