खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Imtiaz Jalil

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव करत विजय मिळवला.

विशेष म्हणजे जलील हे वंचित बहुजन आघाडीकडून विजयी झालेले एकमेव खासदार आहेत. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे.