खासदार इम्तियाज जलील यांचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह

खासदारांसह इतरांचे स्वॅब निगेटिव्ह

Coronavirus

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या भावाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक व ट्विटर अकाउंटवरून दिली. इम्तियाज जलील यांच्या भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर इतरांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. तरीही नियमाप्रमाणे होम क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे दि. १० ते १८ जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन आणि महापालिकांच्या कामाचा आढावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बैठकीला होम क्वारंटाईनमुळेच इम्तियाज जलील हे अनुपस्थित होते. तसेच आणखी काही दिवस ते कुटुंबासह होम क्वारंटाईन राहण्याची शक्यता आहे.

मास्क, सॅनिटायझर वापरून घ्या काळजी
तुम्हालादेखील सर्वांना विनंती आहे, कोरोनाचे कुठलेही लक्षण आढळले, ताप, सर्दी, खोकला जाणवू लागला तर न घाबरता महापालिकेच्या तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करून घ्या. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER