खासदार इम्तियाज जलील यांनीही दिला एक कोटीचा निधी

इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मराठवाड्यातील बहुतांश खासदारांनी आपला खासदार निधी दिला हाेता. परंतु, इम्तियाज जलील यांनी माझ्या मतदारसंघात निधी खर्च करणार असाल तर मी तत्काळ पत्र देतो, अशी भूमिका घेतली होती.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ५१ जणांवर गुन्हे दाखल

त्यानुसार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत एक कोटीपैकी ५० लाख रुपये ग्रामीण भागातील कन्नड, वैजापूर, गंगापूर , खुलताबाद, साेयगाव तालुक्यांतील सरकारी रुग्णालयात ऍम्ब्युलन्स किंवा इतर महत्त्वाच्या आरोग्य यंत्रसामग्री देण्याचे सूचित केले.

तर उर्वरित ५० लाखांचा निधी शासकीय महाविद्यालय, रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, पीपीई-कीट, व्हेंटीलेटर खरेदीसाठी वापरावा असे सूचित केले. खासदार निधी आपल्या सूचनेनुसार, मतदारसंघात आवश्यक आरोग्य सुविधा, यंत्रसामग्री तसेच कोरोनाविरोधातील उपाययोजनावरच खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडील अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मी तत्काळ पत्र दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.