जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरचा साठा विकला; खासदार हिना गावित यांचा आरोप

Heena Gavit

नंदूरबार : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) तुटवडा आणि होणाऱ्या काळ्याबाजारावरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहे. आणि अशातच नंदूरबारच्या (Nandurbar) भाजप (BJP) खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. मात्र असे असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिवीरचा साठा बाहेर विकल्याचा खळबळजनक आरोप गावित यांनी केला आहे.

गावितांच्या या आरोपामुळे नंदूरबार जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. नंदूरबार जिल्हा आणि मतदारसंघातील प्रत्येक गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्सची मागणी वाढली आहे. मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, ताई आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. दवाखान्यांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली. ज्याप्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करून दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करून द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय  घेतला नाही.

अखेर नाइलाजास्तव मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ ५०० इंजेक्शन रुग्णालयांना उपलब्ध करून दिले. रोटरी वेलनेस सेंटरला एक हजार इंजेक्शन देण्यात आले होते. रुग्णालयांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदूरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशीया दोघांनी मिळून हा प्रताप केल्याचा गंभीर आरोपही गावित यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button