पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे गेल्या बैलगाडीतून

Pritam Munde

बीड : बीड तालुक्यातील वाकनाथपूर येथे पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आज (रविवार) दौरा केला. गावात जाण्यासाठी नदीवर पूल नव्हता.

त्यामुळे त्यांना बैलगाडीतून नदी पार करावी लागली. गावात जाऊन त्यांनी ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करून खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. या संकटात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, केंद्र व राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, असे त्यांनी आश्वासन दिले.

ही बातमी पण वाचा : तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते राजेंद्र बांगर, गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. यातच राज्यातील नेते नुकसान दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी दौरा केला.