मिर्झापुर 2 वर बंदी घालण्याची खासदाराची मागणी

Anupriya Patel - Mirzapur 2

नुकतीच सुरु झालेली वेब सीरीज मिर्जापुर 2 (Mirzapur 2) वादात सापडली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) या वेब सीरीजवर नाराज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विट करून या मालिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापुर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु आहेत. परंतु या वेबसीरीजमध्ये या जिल्ह्याला बदनाम केले जात असून हा जिल्हा हिंसेने भरलेला असल्याचे दाखवले जात आहे. तसेच या वेबसीरीजमधून जातीय विद्वेष पसरवला जात असल्याचा आरोप करीत यावर कारवाई करावी अशी मागणी अनुप्रिया पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पहिल्या सीझनच्या दोन वर्षानंतर मिर्झापुरचा पुढील भाग आला आहे. 12 कोटी रपये खर्च करून तयार झालेला पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाला होता. आजा जवळ जवळ 60 कोटी रुपये खर्च करून दुसरा भाग आला आहे. खरे तर मिर्झापुर 2 चे प्रसारण होण्यापूर्वीच याचा विरोध सुरु झाला होता. यात गुड्डू पंडितची भूमिका साकारणाऱ्या अली फजलने यावर्षी जानेवारी महिन्यात सीएएच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. लोकांनी आता त्याचे हे ट्विट फॉरवर्ड करीत मिर्झापुर 2 बंद करण्याची मागणी सुरु केली आहे. #BoycottMirzapur2 हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे. मात्र अली फजलची ती वैयक्तिक भूमिका होती त्याचा या वेबसीरीजशी संबंध नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यातच दुसरा भाग प्रेक्षकांना तितकासा आवडलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER