छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

uddhav thackeray & chhatrapati sambhaji raje bhosale

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणा विषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी 2 डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणाचे मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER