बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचे महत्त्वाचे पाऊल

Amol Kolhe

 नवी दिल्ली : बैलगाडा संस्कृती ही महाराष्ट्राची शान मानली जाते, मात्र बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांमध्ये समावेश झाल्यापासून बैलगाडा शर्यतींवर बंदी आली आहे, मात्र आता शर्यतीवरील बंदी हटविण्यासाठी शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सरसावले आहे

बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी हा दर्जा काढावा या मागणीसाठी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरीराज सिंह यांच्यासोबत बैलगाडा शर्यतीवर चर्चा केली तसेच आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले .

उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. प्राणीमित्र संघटनांच्या याचिकेनंतर यासंदर्भातील मुद्दा न्यायालयात गेला आहे. सध्या तो अंतिम सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या शर्यती पुन्हा सुरु झाल्यावर ग्रामीण भागात थंडावलेले आर्थिक चक्र देखील पुन्हा पूर्ववत होईल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

 

ही बातमी पण वाचा : भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक ; राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER