खासदार अमोल कोल्हेंनी समजावून सांगितला कोरोनाचा गुणाकार

Amol Kolhe on corona virus

पुणे: कोरोना विषाणु असलेले रुग्ण आपल्याला कोरोनाची माहिती उघडपणे देत वनसल्याने राज्यात ठिकठिकाणी मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण आढळून आले आहे. ही धोकादायक बाबा असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. कोरोना संबंधी कोणतीही लक्षणे आपल्यात आढळून आल्यास त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा हा आजार आपल्या देशाला पोखरून काढेल अशी चिंचा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी कोरोना कसा फैलतो याचीही माहिती साध्या भाषेत समजावून सांगितली.

अमोल कोल्हे सांगितला कोरोनाचा गुणाकर –

लॉकडाऊनच्या काळात एक व्यक्ती नियमांचे उल्लंघन करुन मुंबईहून जुन्नरला आली. 17 मार्चला ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या या व्यक्तीला 27-28 मार्चला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं.

या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका मुंबईच्या आणि दुसऱ्या डिंगोरेच्या नागरिकालाही कोरोना विषाणूची लागण झाली. डिंगोरेच्या नागरिकाला 31 तारखेला लक्षणं (Corona Virus Infection) आढळली. म्हणजेच 17 मार्च ते 30 मार्च या कालावधीत तो अनेकांना भेटला असेल. म्हणजेच या रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणू हा 14 दिवस होता.

म्हणजेच 30 मार्चला तो ज्या कोणाच्या संपर्कात आला असेल, त्याला 13 एप्रिलनंतर लक्षणं दिसून येतील. अशा पद्धतीने कोरोणाचा गुणाकार होत असल्याने सर्वांनी दक्षता घेणे गरजेचं असल्याचं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केलं.ते टीव्ही 9 च्या प्रतिनिधीशी बोलत होते.