समाज आणि प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढणारे चित्रपट

Movies about the corruption of society and administration

हिंदी चित्रपट समाजाचा आरसा असतात. समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न जसा चित्रपटात होतो तसाच प्रशासन, राजकारणी यांच्यातील भ्रष्टाचारावरही बोट ठेवले जाते. मात्र सगळेच चित्रपट असे नसतात. काही चित्रपट फक्त तोंडी लावण्यापुरता हा विषय घेतात तर काही निर्माते मात्र मनापासून अशा प्रकारचे चित्रपट तयार करतात. परंतु चित्रपटापासून काहीही धडा जनता, राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकारी घेताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. दक्षिणेत या विषयावर प्रचंड चित्रपट तयार झालेले आहेत.

अशा चित्रपटांच्या यादीत धर्मेंद्र अभिनीत ‘सत्यकाम’ चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. नरेंद्र सान्याल यांच्या कथेवर आधारित सत्यकामचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते. चित्रपटाचे संवाद राजिंदर सिंह बेदी यांनी लिहिले होते. आणि सत्यकामची मुख्य भूमिका साकारली होती धर्मेंद्र यांनी. चित्रपटात अशोक कुमार, संजीव कुमार आणि शर्मिला टागोर यांच्याही भूमिका आहेत. खरे तर धर्मेंद्रची इमेज अॅक्शन हीरोची आहे परंतु त्याने ही अत्यंत वेगळी अशी भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. हा असा चित्रपट आहे जो प्रेक्षकांना आरसा दाखवणारा आहे. धर्मेंद्रने यात आदर्शवादी इंजीनियर सत्यप्रिय आचार्यची भूमिका साकारली आहे. एका आदर्श नागरिकाप्रमाणे त्याने खूप स्वप्न पाहिलेली असतात. प्रशासनाने जनतेला सर्वतोपरी मदत करावी, त्यांची कामे करावी, परंतु तसे होत नाही आणि यात सत्यप्रियचा बळी जातो. चित्रपट पाहिल्यानंतर सत्यप्रियला झालेला कॅन्सर प्रशासन आणि समाजाला झाल्याचा भास होतो. अत्यंत तीव्रपणे हा चित्रपट आपल्या मनावर परिणाम करतो. त्याकाळी लाच न खाणाऱ्याला, प्रामाणिक माणसाला बदमाश आणि पाजी म्हटले जात असे. या चित्रपटातील एक संवाद “मैं इंसान हूं। भगवान की सबसे बड़ी सृष्टि मैं उसका प्रतिनिधि हूं किसी अन्याय के साथ कभी सुलह नहीं करूंगा, कभी नहीं करूंगा” चित्रपट संपला तरी लक्षात राहातो.

Gabbar is Back (2015) - IMDbयानंतर लगेचच आठवतो तो अक्षयकुमारचा ‘गब्बर इज बॅक’. या चित्रपटात अक्षय कुमारने गब्बरची भूमिका साकारली आहे. चांगल्या कामासाठी गब्बरसारख्या लोकप्रिय खलनायकाचे नाव घेऊन समाजातील पांढरपेशेच कसे खलनायक आहेत ते यात प्रखरपणे दाखवले आहे. हॉस्पिटलमध्ये गरीबांना कसे लुटले जाते आणि गरीबांच्या जीवावर इमले कसे बांधले जातात, भ्रष्टाचाऱ्यांना कोण कसे मदत करते ते खूप टोकदारपणे दाखवले आहे. चित्रपट पाहाताना आपल्या रागाचा पारा चढतो. त्यामुळे चित्रपटात गब्बर या भ्रष्टाचाऱ्यांना जी शिक्षा देतो ती पाहताना असेच केले पाहिजे असे वाटते. सध्या कोरोनाच्या काळात हॉस्पिटलवाले ज्याप्रकारे रुग्णांना लुटत आहेत ते पाहाता या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. स्वतःला ‘ब्रॅन्ड’ समजणाऱ्या पाटील नावाच्या बिल्डरला त्याच्या नावाच्या ब्रॅन्डचा गर्व असतो आणि तो गर्व अक्षयकुमार कसा दूर करतो ते खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहे.

यानंतर नाव घेता येईल ‘रंग दे बंसती’चे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राण अर्पण केलेल्या भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांना आधुनिक रुपात आणून समाजातील भ्रष्टाचार मिटवताना दाखवले होते. आमिर खान, सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी, सोहा अली खान, कुणाल कपूर, आर माधवन, शर्मन जोशी, एलिस पॅटन यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आपल्या एका मित्राच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना त्याचे मित्र कसे धडा शिकवतात ते दाखवण्यात आले होते.

मणिरत्मने ‘युवा’मध्ये भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या तरुणांची कथा मांडली होती. अजय देवगन, रानी मुखर्जी, अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय, करीना कपूर, ईशा देओल आणि सोनू सूदने यात काम केले होते. तरुणांनी जर मनावर घेतले तर समाजातील भ्रष्टाचार संपवता येईल हे यात मणिरत्नमने खूप प्रभावीपणे दाखवले होते.

रेंसिल डिसिल्व्हाच्या ‘उंगली’ चित्रपटातही भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका तरुणांच्या टीमची कथा मांडण्यात आली होती. चित्रपटात इमरान हाशमीने मुख्य भूमिका साकारली असून कंगना रनौत, संजय दत्त, रणदीप हुड्डा, नेहा धूपिया यांच्याही भूमिका आहेत.

Ungli Bollywood Movie Trailer Emraan Hashmi Kangana Ranaut Randeep Hooda  Sanjay Dutt - video dailymotion

प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’मध्ये अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची पार्श्वभूमी घेतली आहे. भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण जनता कशी उभी राहते ते त्यांनी दाखवले होते.

Watch Satyagraha Full Movie Online in HD | ZEE5

राजकुमार संतोषी यांनीही ‘हल्ला बोल’ चित्रपट निर्माण करून समाजातील भ्रष्टाचारावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अजय देवगन, विद्या बालन अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र विशेष चालला नाही.

हल्ला बोल (Film): Reviews, Ratings, Cast and Crew - Rate Your Music

एस शंकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नायक’ चित्रपट आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे जनतेपुढे तरुणांनीच आणला आहे. एक सामान्य तरुण कसा भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवतो ते खूप प्रभावीपणे यात दाखवण्यात आले होते. या सामान्य तरुणाची भूमिका अनिल कपूरने साकारली होती.

भ्रष्टाचारावर बोट ठेवणारे हे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. जे वेळ मिळाल्यास अवश्य पाहावेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER