पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यासाठी हालचाली सुरू; संजय राऊतांचे मोठे विधान

Sharad Pawar - Sanjay Raut

मुंबई : सध्या देशात एक विरोधी पक्षांचा सक्षम गट असावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पीछेहाट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मोदी सरकार विरोधात एक सक्षम विरोधी आघाडीची गरज आहे. यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सक्षम नेते आहेत. त्यासाठी इतर विरोधी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्याचे मोठे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केले. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, आता काँग्रेसला मोठी मुसंडी मारणे गरजेचे आहे. सध्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी एका सक्षम नेत्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावण्यासाठी ते सक्षम नेतृत्व आहे. यूपीएचा आत्मा काँग्रेसच राहणार आहे. मात्र नेतृत्व शरद पवारांकडे देण्यासाठी इतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. काल शरद पवारांची भेट घेत याबाबतची चर्चा झाली. काँग्रेसच्या सद्य:स्थितीबाबत चर्चा झाली असून, शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात दिसू शकतात, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपाला उत्तर दिले. फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कालच उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. राज्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. राज्य सरकारतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करत कौतुक केलं आणि हेच फडणवीसांसाठी उत्तर असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button