केंद्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याच्या हालचाली

Petrol - Diesel

नवी दिल्ली :- पाच राज्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारानंतर मोदी सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे सध्या नुकसान होत आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) सुधारित दर निवडणुका झाल्यावर लगेच जाहीर करू शकते.

माहितीनुसार, पेट्रोलचा दर प्रतिलिटर तीन रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग होऊ शकते. आधीच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

२७ फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारदा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना इंधनाचे दर वाढविणे अपरिहार्य झाले आहे. सध्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरीत्या कमी ठेवले जातील, असा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार येणार आहे. यातील चार राज्यांत मतदान संपले आहे. तर बंगालमध्ये आजचा सहावा टप्पा धरून तीन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. २९ एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर मोदी सरकारकडून इंधन दरवाढीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button