टोरंटचा ठेका रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी टोरंट हटाव समितीचे आंदोलन

ठाणे(प्रतिनिधी) : कळवा – मुंब्रा उपविभागीय येथे टोरंट वीज कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी टोरंट हटाव समितीच्यावतीने शासकीय विश्रामगृहा बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : वीजबिल भरतांना संगणकीकृत पावत्याच स्वीकारा : महावितरणचे ग्राहकांना आवाहन

कळवा – मुंब्रा या उपविभागातील रिक्त पदांचा भरणा त्वरीत करण्यात यावा, मीटरची आवश्यक्ता असतांना अर्ज केल्यानंतरही 15 दिवसांत ग्राहकाला मीटर मिळणे, साहित्याचा अभाव असल्याकारणाने त्वरीत पुरवठा करावा इतकेच नव्हे तर, प्रीपेड मीटर बसविल्यास आमची हरकत नाही, कर्मचार्‍यांना स्व संरक्षण द्यावे आदी मागण्यांसह टोरंटचा ठेका रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी टोरंट हटाव समितीच्यावतीने शुक्रवारी दुपारी शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र, या आंदोलनाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. केवळ 10 लोकांनीच या आंदोलनात सहभागी घेतल्याचेे यावेळी दिसून आले.

ही बातमी पण वाचा : लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी रविवारी पुण्यात महामोर्चा