ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग

Election Commision Of India

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी आयोगाने चाचपणीही सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल ते जून २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER